परभणी येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजवंदन उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी त्यांनी सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपले सरकार कटिबद्ध असून, त्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलण्याचे आश्वासनही पालकमंत्री बोर्डीकर यांनी दिले.