परभणीच्या सेलू तालुक्यातील म्हाळसापूर कुंडी शिवारात कसूरा नदीच्या काठावर बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी शेतात कामाला गेलेल्या काही शेतकऱ्यांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येते.