आषाढी एकादशीचं औचित्य साधून प्रभावती रायडर्सच्या वतीने परभणी ते पंढरपूर असा 300 किलो मीटरची सायकलवारीचं आयोजन करण्यात आलं आहे. पर्यावरणपूरक आणि निसर्गसंवर्धन करण्याकरीता तसंच सामाजिक एकतेचा संदेश घेऊन या सायकलवारीचं नियोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमात 15 सायकलिस्टने सहभाग नोंदविला आहे.