परभणी जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे चिकू आणि आंबा पिकाचे मोठे नुकसान झालेलं आहे. धानोरा येथील चिकू उत्पादक शेतकरी विलास काळे यांनी दोन एकरमध्ये चिकूची बाग उभी केली होती. मा झालेल्या अवकाळी पावसाने झाडाला लागलेले चिकू गळून पडल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे..