केज तालुक्यातील घाटेवाडी येथील शाळेला पहिल्याच दिवशी पालकांनी ठोकले कुलूप, शिक्षक नसल्याने 135 विद्यार्थ्यांचे मागितले सामूहिक टिसी. गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयासाठी गेल्या वर्षभरापासून शिक्षक नसल्याने केज तालुक्यातील घाटेवाडी येथील ग्रामस्थांनी यापूर्वीच प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केलेला आहे.