महादेवाच्या उपासने साठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पवित्र श्रावण महिन्याला आज पासून सुरुवात झाली आहे. पहाटे तीन वाजता ज्योतिर्लिंग वैजनाथ वैजनाथाला देवस्थान ट्रस्ट कडून अकरा मानकरी पुरोहितांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात रुद्राभिषेक महाआरती करण्यात आली. यानंतर पहाटे चार वाजेपासूनच वैजनाथ मंदिर भाविकांसाठी खुले केले गेले. पहाटेपासूनच भाविक ज्योतिर्लिंग वैजनाथच्या दर्शनासाठी दाखल झालेले दिसून आले.