परळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने सिरसाळा-औरंगाबाद मुख्य मार्ग बंद करत तीव्र आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून शेत रस्ता खुला करण्याची मागणी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने दहिफळे बंधूंनी हा टोकाचा निर्णय घेतला. जोपर्यंत शेत रस्ता मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.