बीडच्या परळी येथील स्ट्रॉंग रूम परिसरात झालेल्या गोंधळानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्व स्ट्रॉंग रूम परिसराचा आढावा घेऊन पोलीस बंदोबस्त दुप्पट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर परळी, गेवराई आणि बीड या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली होती. तर माजलगाव येथील स्ट्रॉंग रूम परिसरात कालपासून पोलीस बंदोबस्तात दुप्पट वाढ करत तगडी सुरक्षा देण्यात आली आहे.