परळी शनिश्वर जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा निघाली. ही शोभायात्रा मोंढा मार्केट हनुमान मंदिर पासून राणी लक्ष्मीबाई टावर ते शनी मंदिरापर्यंत होती. या शोभा यात्रेमध्ये समाजातील मोठ्या संख्येने महिला पुरुष हातात पताका, मंगल कलश, घेऊन सहभागी झाले होते. तसेच शाळेकरी मुलं मुली विविध संतांच्या वेषभूषांमध्ये सहभागी झाले होते