परळीमध्ये आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधात महामोर्चा काढण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या महामोर्चाला सुरुवात झाली.या महामोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने अनुसूचित जाती वर्गातील 59 उपजातींचे समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.हा महामोर्चा रेल्वे स्टेशन, राणी लक्ष्मीबाई टॉवर या मार्गे मोंढा मार्केट मैदानात या मोर्चाचा सभेने समारोप झाला.