परळी नगरपरिषदेत महायुतीची सत्ता असताना देखील नगरपरिषद प्रशासनाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा विसर पडला.यामुळे शिवसैनिकांनी आक्रमक होत याचा तीव्र निषेध व्यक्त केला.यावेळी संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. याबाबत नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांना यावेळी शिवसैनिकांनी जाब विचारला. या वेळी नगरपरिषदेचे उपमुख्याधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, यावेळी शिवसेनेने नगरपरिषदेत जोरदार घोषणाबाजी केली.