परळी शहरात कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटच्या सायलेन्सरवर पोलिसांनी थेट बुलडोझर चालवून मोठी कारवाई केली. गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांकडून या त्रासदायक आवाजाबाबत तक्रारी होत होत्या. परळी पोलिसांनी विशेष मोहिम राबवून तब्बल 49 बुलेटच्या सायलेन्सर जप्त केले. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या परिसरातील रस्त्यावर हे सर्व सायलेन्सर ठेवून त्यावर बुलडोझर फिरवण्यात आले. या कारवाईनंतर शहरात समाधान व्यक्त होत असून, असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी युवकांना इशारा दिला आहे.