राष्ट्रसंत भगवान बाबांची 130 वी जयंती परळी वैजनाथ शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त भगवान बाबा चौकाचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले असून, जयंतीनिमित्त भगवान बाबा चौकातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.