दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश आज कोल्हापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात आणण्यात आला. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीदेखील स्वर्गीय अजित पवार यांच्या अस्थींचं दर्शन घेतलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.