वंदे भारत एक्सप्रेस च्या तिकीट दरात कपात केल्यामुळे एक्सप्रेसला प्रवाशांची कुर्डूवाडी जंक्शनवर गर्दी वाढली आहे. अगोदर वंदे भारतने पुण्याला जाण्यासाठी ८०० रुपये लागत होते.यात २०० रुपये कपात केल्यामुळे ६०० रुपयावर येऊन पोहचले आहे. यामुळे पुणे प्रवासाला प्रवाशांची कुर्डूवाडी जंक्शन वरुन अधीक पसंती मिळताना पहायला मिळत आहे.