विरार रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांना झुरळांचा त्रास जाणवतोय. लोकलमध्ये झुरळं फिरत असल्याचा व्हिडीओ काढून एका प्रवाशाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. विरारहून चर्चगेटला सुटलेल्या दुपारच्या 2.38 वाजताच्या लोकलमध्ये झुरळ होते. लोकलच्या स्वच्छतेबाबत प्रवाशांनी प्रश्न निर्माण केला आहे.