एसटी महामंडळाने सवलतधारक प्रवाशांसाठी नव्याने सुरू केलेल्या 'NCMC स्मार्ट कार्ड' योजनेला धुळ्यात नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या आधुनिक डिजिटल कार्डमुळे खऱ्या लाभार्थ्यांना एसटीच्या सवलतींचा थेट आणि पारदर्शक लाभ मिळणार आहे. यामुळे सुट्या पैशांवरून होणारे रोजचे वाद मिटून कॅशलेस प्रवास सुलभ होईल आणि बनावट कागदपत्रांद्वारे एसटीत होणाऱ्या फसवणुकीला कायमचा आळा बसणार आहे. सध्या धुळे शहरातील बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी हे कार्ड घेण्यासाठी गर्दी केलेले आहे.