परभणी जिल्ह्यातील नरसिंह पोखरणी फाट्यावर रस्त्यातच बस बंद पडल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. बस चालू करण्यासाठी प्रवाशांना बसला धक्का देण्याची वेळ आली. तरीही नादुरुस्त बस जागेवरच ढीम्म उभी राहिल्याने प्रवाशांना इतर पर्यायी वाहनांनी गंतव्य ठिकाण गाठण्याची वेळ आली. "सुरक्षित प्रवास" महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य आता नावालाच राहिल्याची प्रतिक्रीया प्रवाशांनी व्यक्त केली आहे.