पुणे विभागातील पाटस रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडावे लागत आहेत. नुकतीच एका महिलेने मालगाडीखाली झोपून जीव वाचवल्याची थरारक घटना घडली.