बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती असलेल्या एका महिला रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.. वार्ड क्रमांक पाच मध्ये एक महिला रुग्ण उपचार घेत आहे, या महिलेचे पती आणि भावांमध्ये वाद होऊन वार्डातच हाणामारीला सुरुवात झाली. या प्रकारानंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच धांदल उडाली होती. तर रुग्णांमध्येदेखील भीतीचx वातावरण पाहायला मिळालं.