15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या विटा येथे भाजपच्यावतीने तिरंगा रॅली काढण्यात आली.माजी नगराध्यक्ष वैभव पाटील युवा मंचच्यावतीने आयोजित तिरंगा रॅली मध्ये हजारो विटेकर नागरिक हातात तिरंगा ध्वज घेऊन दुचाकीसह सहभागी झाले होते.भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आणि पहलगाम हल्ल्याच्या विरोधात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ विटा शहरतल्या प्रमुख मार्गावरून भारत मातेच्या जयघोषात ही तिरंगा रॅली काढण्यात आली.