थंडी वाढू लागताच बुलढाण्याच्या बाजारपेठेत वाटाण्याच्या शेंगा दाखल झाल्या आहेत. मात्र मागील आठवड्यात बाजारात आवक कमी असल्यामुळे या 'हिरव्या मोत्यां'ना अक्षरश सुकामेव्याचा भाव आला होता. बुलढाणा शहरात मागील आठवड्यात वाटाण्याच्या शेंगा तब्बल 100 रुपये प्रति किलो दराने विकल्या गेल्या. मात्र आवक वाढल्याने आज बाजारात 40 रुपये प्रति किलो दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.