पिंपरी चिंचवड शहरातील मोशी इथल्या कुदळे वस्ती परिसरात भटक्या कुत्र्याच्या पाठलागमुळे एक मोर विहिरीत पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मोराची सुखरूप विहिरीतून सुटका केली. सुखरूप सुटका केल्यानंतर मोराला पुढील उपचारासाठी कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आलं आहे.