गणेश मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेणमधील गणेशमूर्ती यंदा परदेशात उशिराने पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आखाती देशांतील युद्ध परिस्थितीचा थेट फटका मूर्ती व्यावसायिकांना बसत असून मूर्तिकारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.