पेण तालुक्यात झालेल्या पहिल्याच पावसाचा फटका एका गणेशमूर्ती कारखानदाराला बसला आहे. पेणच्या कळवा गावात पावसाचे पाणी वाहून नेणारा नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडल्यामुळे पाणी गणेश मूर्ती कारखान्यात शिरले आणि मूर्ती भिजल्या आहेत. यावर स्थानिक प्रशासनाने मार्ग काढावा अशी मागणी कारखाना मालकाने केली आहे.