पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळील पिपरिया गावात वाघाच्या हल्ल्यात संगीता वाघरे यांचा बळी गेल्यानंतर वनविभागाने तातडीने कारवाई केली. संशयित वाघ T-I-08 ला अवघ्या २४ तासात कॅमेरा ट्रॅप व पगमार्क तपासणीच्या आधारे जेरबंद करण्यात आले. या वेगवान कारवाईमुळे संतप्त गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, मानव-वन्यजीव संघर्षावर नियंत्रण मिळवण्यात यश आले.