छत्रपती संभाजीनगरमधील पैठण इथं नाथषष्ठी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी कमी करण्यात आलं आहे. पाणी ओसरल्यामुळे नदीचं विस्तीर्ण पात्र उघडं पडलं असून, या गाळामध्ये सोनं शोधण्यासाठी शेकडो नागरिकांची एकच गर्दी उसळली आहे. हातात चाळण्या, टोपल्या आणि आशेने भरलेल्या नजरा घेऊन आबालवृद्ध नदीपात्रात नशीब आजमावताना दिसत आहेत.