अकोला जिल्हातल्या वाडेगावच्या निर्घृणा नदीपात्रात पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्याला सुखरूपपणे वाचवण्यात आले आहे. पुरात अडकलेल्या व्यक्तीने एका छोट्या झाडाचा आधार घेतला होता. नदीपात्रातून जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन हा शेतकरी पुरात अडकला, त्यानंतर वाडेगाव ग्रामस्थांनी एकजुटीने अथक प्रयत्न अर्थातच रेस्क्यू करीत पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढले.