नाशिकच्या वडनेरलगत पिंपळगाव रोड रेंजरोड परिसरात शुक्रवारी (७ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे आठ वाजता बिबट्याने लहान मुलावर हल्ला केला. शेतीवस्तीवर राहणाऱ्या कुटुंबातील ३ वर्षीय आयुष किरण भगत याला तोंडात धरत जंगलात फरपटत नेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.