एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून दुसरीकडे वाशिम जिल्हात मात्र सलग पाचव्या दिवशीही डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा कायम आहे. वाशिम शहरातील पेट्रोल पंप आजही बंद असून शहरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध आहे, त्या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदीसाठी सकाळी सहा वाजल्यापासूनच रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहे.