जळगावात दोन दिवसांपासून बंद असलेले पेट्रोल पंप पूर्वपदावर आले आहेत. पेट्रोल डिझेलचा साठा संपल्याने पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ चालकांवर आली होती. कंपन्यांकडून होणारा पेट्रोल - डिझेलचा साठा उपलब्ध झाल्यानंतर आज पेट्रोल पंप सुरू झाले आहेत. वेग-वेगळ्या अफवांमुळे नागरिकांची पंपावर होणारी गर्दी देखील आता कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे..