उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून किमान तापमानाच्या पाऱ्यात दररोज घसरण होत असताना आज थंडीचा अंशतः जोर ओसरला. 6.3 अंश सेल्सिअसवर किमान तापमानाचा पारा आला. मात्र या थंडीचा कडाका कायम असल्याने लासलगाव येथील शिव नदीच्या पाण्यावर बाष्पयुक्त धूके तयार होत असल्याने नयनरम्य दृश्य दिसत आहे.