करमाळा तालुक्यातील वांगी नंबर २ येथील ग्रामदैवत श्री झोटिंग बाबा आणि आई तुळजाभवानी माता यांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री झोटिंग बाबा व माता तुळजाभवानीच्या मूर्तीच्या मिरवणुकीने संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते.