जगभरातील एकमेव लोण्याची हनुमान मूर्ती असलेल्या जळगावातील रिधूर येथील अवचित हनुमान मंदिराबाहेर भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. हनुमान जंयती निमित्त दर्शनासाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. भाविकांनी अर्पण केलेल्या लोण्यातून साकारलेले जागृत ‘अवचित हनुमान’ भर उन्हाळ्यातही हनुमानाच्या मूर्तीवरील लोणी वितळत नाही. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक तापमान असताना सुद्धा मूर्तीवरील लोणी वितळत नाही. नवसाला पावणारा 'अवचित हनुमान' अशी या तीर्थक्षेत्राची ख्याती आहे. उन्हाळ्यातदेखील आठ फूट मूर्तीवरील लोणी वितळत नाही, हे विशेष आहे.