अधिकमासानिमित्त मुलींना चांदीचे पैजण किंवा जोडवे भेट देण्याची परंपरा आहे. मात्र पिंपरी-चिंचवडमधील बारणे कुटुंबाने ही परंपरा अनोख्या पद्धतीने जपत आपल्या सून आणि मुलींना तब्बल लाखो रुपये किमतीची चांदीची पादत्राणे भेट दिली आहेत. पिंपरी-चिंचवडच्या संतोषनगर भागातील सचिन बारणे कुटुंबीयांनी अधिकमासानिमित्त तीन जोडी खास चांदीची पादत्राणे तयार करून घेतली आहेत.