पिंपरी-चिंचवडमध्ये नोकरीच्या निमित्ताने लाखो तरुण शहरात आले आहेत. या तरुणांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय शहरातील चपाती-भाजी सेंटर करतात. मात्र आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता या सेंटरवरही झाला आहे. कमर्शियल गॅस मिळत नसल्याने अनेक चपाती-भाजी सेंटर बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.