नगरसेवक, विधानसभा आणि तीन वेळा खासदारकी लढलेल्या श्रीरंग बारणेंनी यंदा पहिल्यांदाच चिरंजीवाला मतदान केलं. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी नशीब अजमावत असलेले पुत्र विश्वजित आणि पुतणे निलेश यांच्यासाठी खासदारांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. पुत्र आणि पुतणे एकाचवेळी एकाच प्रभागातून निवडणूक लढत असल्यानं बारणेंचा कस लागलाय. भाजपने ऐनवेळी युती तोडल्यानं त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागलाय.