विषारी दारू प्रकरणातील दारू विक्रेता कर्नल सिंग विरखा याच्या घरावर महापालिकेकडून सलग दुसऱ्या दिवशी हातोडा चालू ठेवला आहे. आज सायंकाळपर्यंत संपूर्ण घर जमीन दोस्त होणार आहे. या कारवाईसाठी आज ट्रॅक्टर ब्रेकरचाही वापर केला जात आहे. १८ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या विरखाचे याचे घरे जमीनदोस्त झाल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.