पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील बाथरूममध्ये दारूच्या बाटल्या आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.महापालिकेचे मुख्यालय हे अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे शासकीय ठिकाण असतानाही, या ठिकाणी असा प्रकार घडल्याने प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.