पिंपरी-चिंचवड शहरात नीट पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद उमटू लागले असून, आरसीसी क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी फलकाची संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.