दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी - अलनकापूरम रस्त्यावर नितीन याचे मित्र अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी फॉर्च्युनरमध्ये गोळी झाडून त्याची हत्या केली होती. या घटनेच्या सीसीटीव्हीत त्याला कशा पद्धतीने गाडीत गोळी घालून बाहेर फेकून देण्यात आले आणि पायावरून गाडी घालून आरोपीने कसा पळ काढला ते दिसत आहे.