अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडवर आज दुपारी 18 इंची जलवाहिनीला मोठी गळती लागल्याची घटना घडली आहे. यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. दुपारच्या सुमारास लिंक रोडवरील मुख्य 18 इंची पाण्याच्या पाईपलाईनमधून अचानक पाणी बाहेर येऊ लागले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने महानगरपालिकेला याची माहिती दिली.