मोखाडा खोडाळा रस्त्यावरील देवबांध शिवारात एका किराणा दुकानाच्या गच्चीवर दमण बनावटीच्या विदेशी दारूच्या बाटल्यांना बनावट लेबल लावण्याचे गोरखधंदा उघडकीस आणण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आले.उत्पादन शुल्क विभागाने लेबल बदलताना चार कामगारांना रंगेहाथ पकडले.कारवाई दरम्यान ६०४.८० बल्क लिटर परराज्यातील विदेशी मद्य (७० बॉक्स),९७०० बनावट लेबल आणि महिंद्रा पिकअप जप्त करण्यात आली आहे.जप्त मुद्देमालाची किंमत १७ लाख ६७ हजार ३०० रुपये आहे.