प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता लवकरच येणार असला तरी, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेले नाही किंवा आधार बँक खात्याशी लिंक केलेले नाही, त्यांना हा हप्ता मिळणार नाही. लाभार्थींनी आपली माहिती तपासणी करून कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा कृषी कार्यालयातून अपडेट करणे महत्त्वाचे आहे.