भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर शानदार परेडचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी आपल्या संदेशात, हा राष्ट्रीय सण सर्वांच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण करो, तसेच विकसित भारताचा संकल्प दृढ होवो अशी सदिच्छा व्यक्त केली.