सिल्लोड येथे पारंपरिक पद्धतीने हनुमान मंदिर येथील वेशीतून पोळा सणाला सुरुवात झाली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मानाच्या बैलाचे पूजन करून पोळा सणाला उत्साहात सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शेतकरी रामेश्वर कैलास पाटील हाडोळे यांचा सत्कार आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.