नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी साईनगरी पूर्णत: सज्ज झाली असून, देशभरातून मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी व्यापक नियोजन करण्यात आल आहे. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रोजी मध्यरात्रीपासून साई मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुले राहणार आहे. पोलीस प्रशासन देखील सज्ज झालं आहे.