कोल्हापूरच्या राजाचा आगमन सोहळा काल सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र या सोहळ्यादरम्यान अनेक तरुणांनी हुल्लडबाजी केली. बाप्पाच्या स्वागतासाठी कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर अमाप गर्दी जमली होती. त्यामुळे अनेक तरुणांनी होर्डिंगवर चढून हा आगमन सोहळा पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पोलिसांनी त्यांना लाठीचा चांगलाच प्रसाद दिला आहे.