दौंड तालुक्यातील यवत येथे निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरातही पोलिस प्रशासन सतर्क झालं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सायंकाळी इंदापूर शहरात रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च बाबा चौक – एस.टी. स्टँड – आय कॉलेज – 40 फूट रोड – भगतसिंह चौक – नेहरू चौक – मेन बाजारपेठ – छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर पार पडला. या रूट मार्चदरम्यान इंदापूर पोलीस स्टेशनमधील 4 अधिकारी आणि 32 पोलीस अंमलदार, तसेच सोलापूर ग्रामीण येथील दंगा नियंत्रण पथकातील 1अधिकारी आणि 30 पोलीस अंमलदार उपस्थित होते.