छत्रपती संभाजीनगर शहरात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तस्करांची शहरातून धिंड काढण्याचा पॅटर्न पोलिसांनी गुरुवारी कायम ठेवला. चरस विक्रीत पकडलेल्या पाच आरोपींपैकी चार जणांची मुकुंदवाडी पोलिसांनी आझाद चौक, रहेमानिया कॉलनी, रहिमनगर या जिन्सी परिसरातून धिंड काढली. शिवाय त्यांच्या घराची झाडाझडती घेतली.